हस्तिदंताचे वजन 150 किलो
इस्रायलमध्ये पुरातत्व तज्ञांनी एक हस्तिदंत शोधून काढला असून तो 5 लाख वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. संशोधकांनुसार आता अशा प्रकारचे हत्ती विलुप्त झाले आहेत. जीवशास्त्रज्ञ ईटन मोर यांनी दक्षिण इस्रायलमधील रेवादिम गावानजीक याचा शोध लावला आहे. या हस्तिदंताचे वजन 150 किलो तर लांबी 2.6 मीटर (8.5 फूट) असल्याचे त्यांनी सांगितले.
हा अत्यंत संरक्षित हस्तिदंत असून तो शोधण्याची कामगिरी अत्यंत आनंददायी होती. या दाताचा आकार पाहून हत्ती 16 फूट उंचीचा राहिला असावा. म्हणजेच आताच्या आफ्रिकन हत्तींपेक्षाही तो खूपच मोठा राहिलेला असेल. या क्षेत्रात राहणऱया प्रीहीस्टोरिक ह्युमन्स देखील आफ्रिकन असावेत असे उद्गार उत्खनन संचालक एवी लेव्ही यांनी काढले आहेत.
हस्तिदंताच्या एका बाजूला चमकणाऱया दगडाची उपकरणे होती. म्हणजेच प्रीहीस्टोरिक ह्युमन्स या दगडाचा वापर प्राण्यांना कापण्यासाठी आणि त्यांची कातडी मिळविण्यासाठी करत असावेत. रेवाडिम स्थळावर मागील उत्खननात हत्तीची हाडं आढळून आली होती असे लेव्ही यांनी सांगितले आहे.
प्रागैतिहासिक मनुष्यांनी या हस्तिदंताच्या आसपास एखाद्या प्रकारचा वाधी केला असण्याची शक्यता आहे. कुठल्याही तरी आपत्तीनंतर त्यांना हे क्षेत्र सोडावे लागले असावे. उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आणखी परीक्षण करावे लागणार आहे. याचमुळे पुढील संशोधनासाठी हस्तिदंत इस्रायल एंटीक्विटीज अथॉरिटीमध्ये हलविण्यात आल्याचे तेल अवीव विद्यापीठातील जैवशास्त्रज्ञ हर्शकोविट्ज यांनी म्हटले आहे.