Tarun Bharat

हेस्कॉमकडून प्रतियुनिट 5 पैशांची दरवाढ

1 एप्रिलपासून राज्यात नवे दर लागू  : घरगुती ग्राहकांसाठी पहिल्या टप्प्यात 30 ते 40 युनिट प्रतिमहिना निर्धारीत : चार्जिंग स्टेशनच्या दरात वाढ नाही

प्रतिनिधी / बेळगाव

राज्य सरकारने वीज वितरण कंपन्यांना दरवाढ करण्यास परवानगी दिल्याने 1 एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे मे महिन्यात येणाऱया वीजबिलात ही दरवाढ होणार आहे. एकीकडे उष्णतेचे चटके बसत असताना दुसरीकडे आता दरवाढीमुळे हेस्कॉमचा झटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

दरवषी 1 एप्रिलपासून राज्यात नवे विद्युत दर लागू केले जातात. राज्यातील वीज वितरण कंपन्या दराचा प्रस्ताव केईआरसीकडे पाठवितात. यानंतर नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यानंतर केईआरसीकडून अंतिम दरवाढ लागू केली जाते. यावषी राज्य सरकारने 4 एप्रिल रोजी नवी दरवाढ घोषित केली आहे. हेस्कॉमकडून इंग्रजी व कन्नड वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे नवीन दरांविषयी माहिती देण्यात आली आहे.

एचटी व एलटी ग्राहकांसाठी प्रतियुनिट 5 पैसे दरवाढ करण्यात आली आहे. एलटी व एचटी टेंपररी ग्राहकांसाठी 10 पैसे प्रतियुनिट व फिक्स चार्जेस 25 रुपये प्रतिकिलो वॅट करण्यात आले आहे. फिक्स चार्जेसमध्ये 10 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांसाठी पहिल्या टप्प्यात 30 ते 40 युनिट प्रतिमहिना निर्धारीत करण्यात आला आहे. राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकलला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हेस्कॉमने एलटी-6 मधून वीजपुरवठा होणाऱया चार्जिंग स्टेशनच्या दरात कोणतीही दरवाढ केलेली नाही.

अशी असणार दरवाढ…

  • चटी व एलटी ग्राहकांसाठी प्रतियुनिट 5 पैसे वाढ
  • टेंपररी मीटरसाठी प्रतियुनिट
  • 10 पैसे दरवाढ तर फिक्स चार्जेस 25 रुपये प्रतिकिलो वॅट

लघुउद्योजकांना मिळणार सवलत

कोरोनाकाळात व्यवसाय ठप्प असल्याने लघुउद्योजकांना मोठा फटका बसला होता. त्यांना काही प्रमाणात मदत व्हावी यादृष्टीने हेस्कॉमकडून वीजबिलात सवलत दिली जाणार आहे. मान्यताप्राप्त लघु उद्योजकांना प्रतियुनिट 50 पैसे सूट देण्यात येणार आहे. बेळगाव परिसरात लघुउद्योजकांची संख्या मोठी असल्यामुळे याचा फायदा बेळगावला सर्वाधिक होणार आहे.

Related Stories

प्रेरणा उत्सव साध्यापद्धतीने साजरा

Patil_p

ग्राम पंचायत निवडणुकीत विविध निर्बंध

Patil_p

नंदगड परिसरात सार्वजनिक गणपतांचे विसर्जन

Patil_p

स्मार्ट बसथांबा बनला पार्किंगतळ

Amit Kulkarni

खानापूर लोकअदालतीला ग्राहकांचा प्रतिसाद

Amit Kulkarni

केएलई इंन्डिपेंडंट पीयू कॉलेजमध्ये कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!