दमास्कस
ईस्त्रायलने सीरियातील दमास्कस विमानतळावर हवाई हल्ले केल्याने पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यात 5 सीरियन सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले. जीवितहानीबरोबरच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईस्त्रायलने अनेक क्षेपणास्त्रे डागली. सीरियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने काही क्षेपणास्त्रे रोखली आणि बहुतेक क्षेपणास्त्रे नष्ट केली. तरीही काही प्रमाणात जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.