ई-कॉमर्ससह लॉजिस्टीक्स व इतर कंपन्यांकडून संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सर्वत्र क्षेत्रात विक्रीवर परिणाम झाला होता. यंदा मात्र कोरोनामुक्त वातावरणामध्ये सर्व उत्सव होत आहेत. सध्याला उत्सवी हंगाम सुरू झाला असून येणाऱया उत्सवी काळामध्ये 5 ते 6 लाख जणांना तात्पुरत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
ऑगस्टपासून ते डिसेंबर या कालावधीमध्ये वरील संख्येच्या लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये रोजगारामध्ये जवळपास 20 टक्के इतकी वाढ दिसणार आहे. ऑफलाईन रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांनी उत्सवी हंगामासाठी आपले वार्षिक सेल सुरू केले असून या अंतर्गत खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसतो आहे.
यावषी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणाऱया सेलला जबरदस्त रिस्पॉन्स मिळणार असल्याचा विश्वास ई-कॉमर्स कंपन्यांसह इतरही कंपन्यांना वाटतो आहे. त्यामुळे आगामी उत्सवी काळामध्ये हे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंगची आघाडी
ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंग यासारख्या क्षेत्रामध्ये रोजगार वाढलेले दिसतील. त्याचप्रमाणे सौंदर्य उत्पादने, आरोग्य आणि आरोग्याशी निगडीत उत्पादने यांची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली असून यामध्ये रोजगाराची संधी अधिक असणार आहे. त्याचप्रमाणे सर्व महत्त्वाच्या ई-कॉमर्स कंपन्या ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, मीशो आणि स्नॅपडील यांनी आपल्या शॉपिंग वार्षिक सेलला सुरुवात केली असून त्याकरताही या कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत. मिंत्राने 16 हजारहून अधिक जणांना या काळामध्ये भरती करून घेतल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रामध्येही या वषी 15 ते 20 टक्के अधिकची नोकरभरती केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. रिटेल क्षेत्रामध्ये डिलिव्हरी व वेअर हाऊसिंग या क्षेत्रामध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे.