Tarun Bharat

50 वर्षांपूर्वीच्या मित्रांनी दिला आठवणींना उजाळा

मो. दो. विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकत्र

प्रतिनिधी / निपाणी

अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या 1970-71 या बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकताच स्नेह मेळावा घेतला. यावेळी 50 वर्षापूर्वीच्या या बॅचमधील मित्रांनी भेटी-गाठी घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  या स्नेहमेळाव्यास पुणे, बेळगाव, मिरज, कोल्हापूर, निपाणी,   कोडणी, खडकेवाडा, अर्जुनी या     भागातील माजी विद्यार्थी उपस्थित राहून बालपणीचे दिवस पुन्हा  एकदा ताजे केले. यावेळी ऍड. अशोक रणदिवे, अजितराव   पाटील, प्रदीप मेहता, विवेक पुरंदरे, एन. डी. कुंभार, रघू घोरपडे, शिवाजी व्हडगे, डॉ. भोसले, पुष्पा मोरे, जी. एस. पाटील, काका पाटील, चंदू पोकले, बाळकृष्ण पाटील, विश्वास सावंत, भालचंद्र पारळे यांच्यासह सुमारे 40 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related Stories

समितीचा अनगोळ येथे प्रचार-पदयात्रा

Amit Kulkarni

जागनूर येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खून

Patil_p

गोवावेस येथील पथदिपांना मुहूर्त कधी?

Amit Kulkarni

जिह्यातील 589 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

आरएलएस कायदा महाविद्यालयात कनकदास जयंती साजरी

Amit Kulkarni

अनधिकृत जाहिरात फलक बनले मनपाची डोकेदुखी

Amit Kulkarni