Tarun Bharat

50 हजार पोलिसांना प्रशिक्षण देणारी ‘कामाक्षी’

सायबर गुन्हे संपविण्यासाठी करतेय धडपड, वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नाव नोंद

गाजियाबादच्या कामाक्षी शर्मा या युवतीने सायबर गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. सायबर गुन्हे रोखण्याबद्दल लोकांना जागरुक करणे आणि 50 हजार पोलिसांना सायबर गुन्हेविरोधी प्रशिक्षण देण्यासाठी या शूर युवतीचे नाव इंडिया वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंद झाले आहे.

महाविद्यालयीन काळात मौजमजा करताना स्वतःच्या मित्रांचा आयडी हॅक करण्याच्या छंदानेच तिला सायबर गुन्हेविरोधी जगतात नाव मिळवून दिले आहे. हॅकरला पकडण्यास मदत व्हावी याकरता पोलीस अधिकाऱयांसोबत काम करण्यास सुरुवात केल्याचे ती सांगते.

2017 पासून ती पोलीस अधिकाऱयांच्या संपर्कात आहे. यादरम्यान फोन ट्रेस करणे आणि आयपी ऍड्रेस शोधणे यासारख्या कामांमध्ये पोलिसांना मदत करू लागली. तिचे काम पाहता दोन वर्षांपूर्वी जगातील पहिले सायबर मिशन पूर्ण करण्यात आले. याच्या अंतर्गत जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत पोलीस कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. या 35 दिवसांच्या मोहिमेत 50 हजार पोलिसांना प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

महामारीच्या काळात बहुतांश लोक वर्क फ्रॉफ होम करत आहेत. अशा स्थितीत सायबर बुलिंगचे गुन्हे वाढले आहेत. अनेक युवतींच्या छायाचित्राचा गैरवापर करण्यात येत आहे, तर लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. अशा स्थितीत सायबर गुन्हय़ांबद्दल सजग असणे गरजेचे असल्याचे कामाक्षीने म्हटले आहे.

कामाक्षी या कामासह अनेक तपास यंत्रणांसोबत जोडली गेलेली आहे. तसेच सैन्यासोबत फ्री लान्सर म्हणून देखील ती काम करते. सायबर गुन्हे संपविण्यासाठी कुणीही मला संपर्क साधू शकतो असे कामाक्षीने सांगितले आहे.

Related Stories

गुरुदासपूरमध्ये पाक तस्करांचा डाव उधळला; गोळीबारात जवान जखमी

datta jadhav

सीबीआय-ईडीचे 42 ठिकाणी छापे

Patil_p

जून तिमाहीत 554कंपन्यांची लाभांश देण्याची घोषणा

Patil_p

आजपासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागले

Patil_p

प्रजासत्ताक दिन सोहळा ‘दिमाखात’

Patil_p

पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर रॉकेट हल्ला

Patil_p
error: Content is protected !!