लोकांनी हजारो शलजमने केला हल्ला
जगातील प्रत्येक देशाच्या स्वतःच्या अशा प्रथा असतात, ज्या तेथील लोक शेकडो वर्षांपासून पार पाडत आले आहेत. स्पेनमध्ये अनेक प्रकारचे सण सर्वसामान्य लोकांच्या मान्यतांवर आधारित आहे. यातील एक सणाचे नाव आहे जैरम्प्लास. या सरणाची सध्या मोठय़ा प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
स्पेनमध्ये शेतीसाठी प्रसिद्ध पिओरनल शहरात जैरम्प्लास महोत्सवात यंदा पूर्वी कधीच न घडलेला प्रकार झाला आहे. पहिल्यांदाच या महोत्सवात जैरम्पलास एक महिला झाली आहे. कित्येक वर्षांपासून आयोजित होणारा हा सण दरवर्षी 19 आणि 20 जानेवारी रोजी पार पडतो. या सणात एक व्यक्ती सैतानाचे रुप धारण करतो. त्यासाठी त्याला अधिक वजनाचे कपडे आणि एक शिंग असलेला सैतानी मुखवटाही परिधान करावा लागतो. या वेशभूषेत हा व्यक्ती शहरात फिरतो आणि लोक त्याला शलजमने प्रतिकात्मक स्वरुपात मारतात.
पहिल्यांदाच एका महिलेने सैतानाचे रुप धारण केले. 27 वर्षीय मारिया हरनँडोने 50 किलोचे कपडे आणि डोक्यावर मोठा मुखवटा घातला. त्यानंतर ती याच वशात शहरात फिरण्यास निघाली. लोकांनी 23 हजार किलोंहून अधिक सलगमचा वर्षाव करत तिला मारण्यास सुरुवात केली. परंतु सैतान होऊन मारिया आनंदी आहे. मी माझा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. माझे वडिल देखील काही वर्षांपूर्वी सैतान झाले होते असे तिने सांगितले आहे.