सिनसिनाटी
सौंदर्यप्रसाधने वापरकर्त्यांसाठी एक धोक्मयाची सूचना एका सर्वेक्षणातून देण्यात आली आहे. सदरच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये विषारी घटकांची मात्रा असल्याने आरोग्यासाठी ते धोक्याचे असल्याचे मत नॉटॅडॅम विद्यापीठातील संशोधकांनी मांडले आहे. अमेरिका व कॅनडातील 50 टक्के सौंदर्यप्रसाधने ही विषारी घटकांनीयुक्त असल्याचा शोध नॉट्रडॅमच्या विद्यापीठातील संशोधकांनी लावला आहे. यासाठी त्यांनी 230 हून अधिकच्या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱया सौंदर्यप्रसाधनांचा अभ्यास सविस्तरपणे केला आहे. 56 टक्के फौंडेशन व आय प्रोडक्ट्स, 48 टक्के ओठांशी संबंधित प्रसाधनांमध्ये फ्लुरिन या घातक रसायनाचा वापर केला असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. या रसायनाचा वापर नॉनस्टीक पॅन, रग्ज व इतर ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी केला जातो.