जिल्हा शासकीय रूग्णालयात टेस्ट नाही
प्रतिनिधी/ सातारा
ऍटीबॉडी तपासणीच्या नावाखाली जिह्यात लॅब मालक आणि डॉक्टर हे बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने कोविड रक्त चाचण्या करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही सोय फक्त खाजगी लॅबमध्ये उपलब्ध आहे. यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात ही सोय नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. या खाजगी लॅबमध्ये 50 जणांनी ऍटीबॉडी टेस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चांगलीच धास्ती निर्माण झाली होती. या कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी रक्त चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले होते. खाजगी लॅब मालकांनी या टेस्टच्या नावाखाली लुट सुरू केल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत होते. मात्र जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या वतीने शहरातील अक्षय ब्लड बँक व बालाजी ब्लड बँक येथे या टेस्ट करण्यासाठी रूग्णांना पाठविण्यात येत आहे. यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात ही टेस्टची सोय नसल्याने ज्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत होती. ते रूग्ण या लॅबमध्ये ऍटीबॉडी टेस्ट करून घेत होते. आतापर्यंत अक्षय ब्लड बॅँकेत 20 जणांनी ही टेस्ट केली आहे. तर बालाजी ब्लड बॅँकेत 30 जणांनी ही टेस्ट केली असल्याचे लॅब मधून सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धास्ती कायम असल्याने खाजगी लॅब मालक यांचा फायदा घेत असल्याचे दिसत आहेत. यामुळे टेस्टच्या नावाखाली पैसे लुटण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयातून ज्या लॅब मध्ये पाठवण्यात येत आहे. त्याच लॅबमध्ये टेस्ट करण्याचे आवाहन रूग्णांना करण्यात येत आहे.