राफेल कर्तव्यपथावर फ्लाय पास्ट करणार : नौदलाचे आयएल-38 अखेरचे उड्डाण करणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळय़ात संरक्षण दलाची 50 विमाने सहभागी होणार आहेत. यात 9 राफेल आणि नौदलाच्या आयएल-38 चे फ्लाय पास्ट होणार आहे. आयएल-38 हे नौदलाचे विमान असून त्याने संरक्षण दलात सुमारे 42 वर्षांपर्यंत सेवा बजावली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सागितले आहे.
कर्तव्य पथावरील आकाशात दिसून येणाऱया 50 विमानांमध्ये 4 विमाने सैन्याची असणार आहेत. एका पत्रकार परिषदेत वायुदलाने आयएएफच्या चित्ररथाच्या मॉडेलचे अनावरण पेल आहे. हा चित्ररथ 26 जानेवारी रोजी संचलनादरम्यान प्रदर्शित केला जाणार आहे. वायुदलाच्या चित्ररथाची थीम ‘भारतीय वायु सेना ः सीमाओं से पार शक्ती’ असून यात वायुदलाच्या काही प्रमुख शस्त्रास्त्र अन् उपकरणांना प्रदर्शित केले जाणार आहे.
नेत्र फॉर्मेशनमध्ये 4 राफेल विमाने
प्रजासत्ताक दिन सोहळय़ादरम्यान 9 राफेल विमाने देखील फ्लाय पास्टचा हिस्सा असतील. 4 राफेल विमाने नेत्र फॉर्मेशनचा हिस्सा असतील, सी-130 विमानांसह बजरंग फॉर्मेशमध्ये 4 राफेल लढाऊ विमाने सामील असणार आहेत. तर एक विमान फ्लाय पास्टच्या अखेरीस ‘व्हर्टिकल चार्ली’चे प्रदर्शन करणार असल्याचे वायुदलाच्या अधिकाऱयाने सांगितले आहे.
फ्लाय पास्टमध्ये दिसणार एरियल फॉर्मेशन्स
आयएल-38 व्यतिरिक्त ‘भीम’ आणि ‘बजरंग’ यासारख्या फॉर्मेशन्सला पहिल्यांदा कर्तव्यपथावर प्रदर्शित केले जाणार आहे. ‘भीम’ फॉर्मेशन एक सी-17 विमान, दोन सुखोई-30 ने तयार झालेले असेल. तर ‘बजरंग’ फॉर्मेशनमध्ये एक सी-130 विमान 4 राफेल विमानांनी घेरलेले असेल.
फ्लाय पास्टदरम्यान अन्य एरियल फॉर्मेशन्समध्ये ‘ध्वज’, ‘रुद्र’, ‘बाज’, ‘प्रचंड’, ‘तिरंगा’, ‘टंगैल’, ‘गरुड’, ‘अमृत’ आणि ‘त्रिशूल’ सामील असणार आहे. भारतीय वायुदलाच्या 144 जवानांच्या संचलन पथकाचे नेतृत्व 32 वर्षी स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी करणार आहे.