गुरु, बॉम्बे, रोजा, थालापति यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक मणिरत्नम सध्या स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पोन्नियिन सेवलन’वरून चर्चेत आहेत. पोन्नियिन सेलवनच्या टीमने अलिकडेच 50 दिवसीय मॅरेथॉन शेडय़ूल पूर्ण केले आहे. आगामी चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित करणार असल्याची माहिती मणिरत्नम यांनी दिली आहे. हा चित्रपट देशाचे महान लेखक आणि कवी आर. कृष्णमूर्ती कल्की यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर बेतलेला आहे.
मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, कार्थी, जयम रवि, जयराम आणि त्रिशा मुख्य भूमिकेत दिसून येईल. याचबराब्sार प्रभू, विक्रम प्रभू आणि ऐश्वर्या लक्ष्मी हे कलाकारही सहाय्यक भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. माजी विश्वसुंदरी असलेली ऐश्वर्या राय दुहेरी भूमिकेत असणार आहे.