Tarun Bharat

मडगाव पालिकेची 21 दिवसात 51 लाखाची वसुली

प्रतिनिधी /मडगाव

मडगाव पालिकेने पडून असलेली थकबाकी वसूल करण्यावर भर दिला असून गेल्या 21 दिवसात 51 लाख रूपयांची वसुली केल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली. आपण नगराध्यक्षपाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पडून असलेल्या थकबाकीवर लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी सांगितले.

मडगाव पालिका क्षेत्रात सुमारे 35 ते 40 टक्के बेकायदा व्यवसाय चालत असल्याने वसुलीसाठी समस्या निर्माण झालेली आहे. परंतु, यासाठी तोडगा काढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. दुकानाच्या मुळ मालकांनी आपली दुकाने भाडेपट्टीवर दिली असून भाडेपट्टीवर देताना दुकान मालकांकडे कोणताच करार केलेला नाही. त्यामुळे दुकान मालक मडगाव पालिकेच्या मान्यते विनाच धंदा करती असल्याचे आढळून आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे.

थकबाकी वसुलीसाठी जेव्हा मोहिम हातात घेण्यात आली, तेव्हा हा बेकायदा व्यवसाय लक्षात आला. दुकानदार पालिकेचा परवाना घेण्यास राजी आहेत. परंतु, मालक त्यांच्याकडे करार करू पहात नाही. त्यामुळे समस्या बनून राहिली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

मडगाव शहरात काही पेट्रोल पंप असून त्याची सुद्धा थकबाकी पडून आहे. काही जणांनी कोर्टात दावा केल्याने थकबाकीवर त्वरित निर्णय घेणे शक्य होत नाही. त्यावर सुद्धा पालिका कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, थकबाकी संदर्भात जी आकडेवारी पुढे केली जाते, त्यात तथ्य नसून येवढी थकबाकी नसल्याचा दावा देखील नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी केला आहे. आपण सद्या थकबाकी वसुलीवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याने जी आकडेवारी वृत्त पत्रातून प्रसिद्ध केली जाते, त्यात तथ्य नसल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

थकबाकी व कचरा समस्या या दोन गोष्टीवर आपला अधिक भर असून पालिकेचा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

फोंडय़ात कांदा अजूनही शंभरीत

Patil_p

म्हापशातील रंगकर्मी रंजन मयेकर यांचे कोविडमुळे निधन

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यासह वाहतुकमंत्री व आमदारांविरूध्द काँग्रेसची पोलीस तक्रार, कारवाईची मागणी

Omkar B

फोंडा तालुक्यातील बंदावस्थेतील प्राथमिक शाळांचा होणार सदुपयोग

Amit Kulkarni

मडगावच्या श्री हरिमंदिराची दिंडी साधेपणाने

Patil_p

गोवा, महाराष्ट्रातील खलाशी दाखल

Patil_p