मुंबई : व्यावसायिक वाहन निर्मिती करणारी कंपनी अशोक लेलँड यांची निर्यातीसह एकूण वाहन विक्री ऑगस्ट 2022 मध्ये वार्षिक 51 टक्क्यांनी वाढून 14,121 युनिट्स झाली असल्याची माहिती कंपनीने गुरुवारी दिली. ऑगस्टमध्ये कंपनीची मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री वार्षिक आधारावर 81 टक्क्यांनी वाढून 8,379 युनिट्सवर गेली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये 4,632 युनिट्सची विक्री झाली. मागील महिन्यात ट्रकची विक्री 70 टक्क्यांनी वाढून 7,325 युनिट्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी 4,297 युनिट्स होती. दुसरीकडे, हलक्या व्यावसायिक वाहनांची (एलसीव्ही) विक्री ऑगस्टमध्ये 21 टक्क्यांनी वाढून 5,742 युनिट्सवर गेली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 4,728 मोटारींची विक्री झाली होती. कंपनीने सांगितले की, देशांतर्गत वाहनांची विक्री 58 टक्क्यांनी वाढून 13,301 युनिट झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा आकडा 8,400 युनिट्स इतका होता.
Previous Articleविरक्ती की आसक्ती?
Next Article दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.