Tarun Bharat

15 मराठा लाईट इन्फंट्री तर्फे 51 वा बुर्ज दिवस उत्साहात

51st Burj Day by 15 Maratha Light Infantry in high spirits

15 मराठा लाईट इन्फंट्री तर्फे 51 वा बुर्ज दिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला येथील माजी सैनिक मुलांच्या वस्तीग्रह सभागृहात हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी 1971 च्या पाक विरोधी लढाईत भाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला बुरुज दिवस हा 15 मराठा लाईट इन्फंट्री साठी शौर्याचा आणि अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा मराठा बटालियन पाकिस्तान विरोधातील लढाईत महत्त्वपूर्ण कामगिरी करीत पाकिस्तानी सैनिकांना सळो की पळो  लावले होते या लढाईत 15 मराठा लाईट इन्फंट्री च्या जवानांना महावीर चक्र, अशोक चक्र शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले होते सहा डिसेंबर 1971 ला 15 मराठा लाईट इन्फंट्री ने पाकिस्तान विरोधी लढाईत जी अतुलनीय कामगिरी केली त्या कामगिरीची आठवण म्हणून 15 मराठा लाईट इन्फंट्री तर्फे हा दिवस बुर्ज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सावंतवाडीत साजरा झालेल्या या कार्यक्रमाला कारवार रत्नागिरी सिंधुदुर्गातील 15 लाईट इन्फंट्री चे निवृत्त जवान आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

लॉकडाऊनमुळे घरांची बांधकामे अपूर्ण

NIKHIL_N

जिल्हा बँकेच्या नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राणेंकडून अभिनंदन

Anuja Kudatarkar

पालिका कर्मचाऱ्यांच्या अभ्यास सहलीवर १२ लाख खर्च

NIKHIL_N

सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा काँग्रेसचा नारा

Anuja Kudatarkar

चिपळुणात आज 24 हजार 395 गणरायांना देणार निरोप!

Patil_p

डॉक्टर्स डे निमित्त आझादी का अमृत महोत्सवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

Anuja Kudatarkar