मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान
वार्ताहर /हुक्केरी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टिप्परची धडक बसून 54 बकऱ्या जागीच ठार झाल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी हुक्केरी तालुक्यातील अम्मनगी येथे घडली. या घटनेत अनेक बकरी जखमी झाली आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खडी वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या टिप्परची अम्मनगी-मुगळी मार्गावरून जाणाऱ्या बकऱ्यांना धडक बसली. यात 54 बकऱ्या जागीच ठार झाल्या यात मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ह्या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी संबंधित टिप्पर चालकावर हुक्केरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.