Tarun Bharat

56 घरफोडय़ातील फरार सराईत चोरटा जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा

वडुज, पुसेगाव पोलीस ठाण्यातील 56 घरफोडीच्या गुह्यातील फरार संशयित आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले. जावेद अनिल काळे (वय 21, रा. वर्धनगड, ता. खटाव, जि. सातारा) असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचेवर वडुज, पुसेगाव पोलीस ठाण्यात दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे नोंद असून तो फरार होता.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडुज, पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही दिवसापुर्वी दरोडा, जबरी चोरी व घरफोडी चोरीचे गंभीर गुन्हे सातत्याने घडत होते. त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन संशयितांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार दि. 6 रोजी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना वडुज, पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरीमधील फरारी आरोपी नेर (ता. खटाव) परिसरामध्ये वावरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पुसेगाव परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पुसेगाव, नेर, फडतरवाडी (ता. खटाव)  परिसरामध्ये सापळा लावला. यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतू पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने वडुज, पुसेगाव येथे मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये साथिदारांसह दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच संशयित आरोपी हा 56 घरफोडय़ांतील फरार आरोपी होता.

 या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱहाड, सहाय्यक फौजदार जोतिराम बर्गे, पोलीस हवालदार तानाजी माने, संतोष पवार, पोलीस नाईक विजय

कांबळे, शरद बेबले, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, चालक पोलीस नाईक संजय जाधव, विजय सावंत यांनी सहभाग घेतला आहे.

Related Stories

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. प्राची पवार यांच्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला

datta jadhav

आता फक्त मरण स्वस्त ; राजू शेट्टींची पोस्ट व्हायरल

Abhijeet Khandekar

ऑक्सिजन संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू

Archana Banage

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

केशरी कार्डधारकांनाही मिळणार स्वस्त धान्य – जिल्हाधिकारी शेखर सिंह

Archana Banage

भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवत आहे; बिहार राजकीय घडामोडींवर पवारांचं मोठं विधान

Abhijeet Khandekar