Tarun Bharat

57 कैद्यांची जामिनावर मुक्तता

बेळगाव / प्रतिनिधी :

कोरोनाच्या धास्तीमुळे हिंडलगा कारागृहात असलेल्या 57 कैद्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये कारागृहात दाखल झालेल्या या कैद्यांची चौकशी व्हावयाची असल्यामुळे त्यांना जामिनावर सोडून नंतर पुढील चौकशी सत्र सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोनाच्या धास्तीमुळे प्रशासनाकडून अनेक निर्णय तातडीने घेण्यात येत आहेत. बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाकडून चौकशी व्हावयाच्या 57 कैद्यांना तुर्तास जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. न्यायालयाने या संदर्भातील आदेशपत्र दिल्यानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती हिंडलगा कारागृहाचे मुख्याधिक्षक कृष्णकुमार यांनी दिली आहे.

Related Stories

पेट्रोल-डिझेल दरात वाढीचे सत्र सुरूच

Amit Kulkarni

विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी बिगुल वाजले

Patil_p

आझादांकडून नव्या पक्षाची घोषणा

Patil_p

संशयित चिनी सैनिक ताब्यात

Patil_p

काश्मिरात सीमेनजीक ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट

Patil_p

बिहारमध्ये आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार : नितीश कुमार

Tousif Mujawar