नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीला चालू आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीत 58 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. सदरच्या नफ्यामध्ये मागच्या तुलनेत 51 टक्के इतकी वाढ झाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. एक वर्ष आधी कंपनीने 39 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. एकूण उत्पन्न घटून 404 कोटी रुपयांवर घसरले आहे. एक वर्ष आधी डिसेंबर तिमाहीत कंपनीने 466 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.