नवी दिल्ली
यंदा देशातील 59 टक्के कंपन्या कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करणार आहे, अशी माहिती जिनियस कन्सल्टंटस् यांनी दिली आहे. मागच्या वषी कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था आता सुधारत आहे. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेतला असता यंदा 59 टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना वेतनवाढ देणार असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. सदरची वेतनाढ ही 5 ते 10 टक्के इतकी असणार आहे. पाहणीत 21 टक्के कंपन्यांनी मात्र यंदा वेतनवाढ होणार नसल्याचे म्हटले आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये कंपनीने याबाबतची पाहणी करून 1200 कंपन्यांचा वेतनवाढीबाबतचा कल जाणून घेतला होता.