डाउनलोड स्पीडमध्ये भारत 69 व्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील काही शहरांमध्ये 5जी इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे मोबाइल डाउनलोडचा सरासरी वेग वाढला आहे. जानेवारीमध्ये, सरासरी मोबाईल डाउनलोड स्पीडच्या बाबतीत भारताची क्रमवारी 10 स्थानांनी सुधारून 69 व्या स्थानावर पोहोचली आहे. डिसेंबरमध्ये भारत 79 व्या क्रमांकावर होता. गेल्या महिन्यात सरासरी मोबाईल डाउनलोड गती 29.85 एमबीपीएस इतकी होती. डिसेंबरच्या 25.29 एमबीपीएसपेक्षा अधिक राहिल्याची माहिती आहे. दोन महिन्यात सरासरी मोबाइल डाउनलोड स्पीडमध्ये भारताच्या क्रमवारीत 36 स्थानांनी सुधारणा झाली आहे.
फिक्स्ड ब्रॉडबँड डाउनलोड गती देखील सुधारते असल्याचे स्पष्ट झाले आहे. फिक्स्ड ब्रॉडबँड डाउनलोड स्पीडमध्ये भारताची क्रमवारी दोन स्थानांनी सुधारून 79 व्या स्थानावर आली आहे. जानेवारीमध्ये ती 50.02 एमबीपीएस होती, जी डिसेंबरमध्ये 49.14 एमबीपीएस होती.