Tarun Bharat

6 क्रिकेटपटू फिटनेस चाचणीत अपयशी

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने देशातील क्रिकेटपटूंकरिता पुन्हा नव्याने तंदुरुस्ती चाचणी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रक्रियेमध्ये 2 किलोमीटर धावण्याच्या चाचणीमध्ये 6 क्रिकेटपटू अपयशी ठरले आहेत.

तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरलेल्या क्रिकेटपटूंमध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसन, इशान किशन, नितीश राणा, राहुल तेवातिया, सिद्धार्थ कौल आणि जयदेव उनादकट यांचा समावेश आहे. बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटपटूंची ही चाचणी घेण्यात आली. आता या चाचणीत अपयशी ठरलेल्या क्रिकेटपटूंना दुसरी संधी दिली जाणार असून नव्या चाचणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱया आगामी वनडे आणि टी-20 मालिकांसाठी क्रिकेटपटूंची ही चाचणी घेतली जात आहे. गेल्या वषीच्या हिवाळी मोसमात ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघामध्ये सॅमसनचा समावेश होता. बीसीसीआयतर्फे या आगामी मालिकांसाठी सुमारे 20 क्रिकेटपटूंची तंदुरुस्ती चाचणी घेतली जाणार आहे.ta

Related Stories

कोरोनाला हरवले, सुवर्णही जिंकले!

Patil_p

ब्रिटनच्या डेपरची स्पर्धेतून माघार

Patil_p

मियामी स्पर्धेत मेदवेदेव्ह, साबालेन्काला टॉप सिडींग

Patil_p

महिलांची टी-20 आशिया चषक पात्रता स्पर्धा

Amit Kulkarni

TokyoOlympics: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा, अंकिता रैना पराभूत

Archana Banage

केएल राहुल, कुलदीप यादव मालिकेतून बाहेर

Patil_p