दूरदूरपर्यंत केवळ बर्फ अन् नीरव शांतता
डॉन शेल्डन ऍम्पीथिएटर नावाच्या ग्लेशियर व्हॅलीमध्ये पोहोचण्यासाठी स्की एक्यप्ड प्लेनशिवाय अन्य कुठलाच मार्ग नाही. येथे खासगी हेलिकॉप्टरद्वारे देखील पोहोचता येते. 60 लाख एकरमध्ये फैलावलेल्या अलासकाच्या ग्लेशियरयुक्त भागात बर्फाव्यतिरिक्त अस्वल आणि काही प्राणीच आढळून येतात.
हे हॉटेल असलेल्या ठिकाणी पोहोचणे सोपे नाही. बर्फात 6 हजरा फुटांच्या उंचीवर सुटी व्यतित करणे निश्चितच सोपी गोष्ट नाही. रॉबर्ट आणि केट शेल्डन यांनी 2018 मध्ये या हॉटेलची निर्मिती केली होती. हॉटेलचे नाव त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या नावावर ठेवले होते. जगातील दुर्गम भागात हॉटेल तयार होताच त्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली होती.
या हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यासाठी लोक खासगी हेलिकॉप्टरमधून दाखल होत असल्याने येथील खर्च तितकाच अधिकआहे. येथे 3 दिवस राहण्यासाठी 35 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 26 लाख रुपयांहू अधिक रक्कम खर्च करावी लागते.
पण शहरी जीवनाला कंटाळलेल्या लोकांसाठी सुटी घालविण्यासाठी याहून अधिक चांगले स्थळ असू शकत नाही. येथे राहण्यासाठी एका जोडप्याला 26 लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो. यात हेलिकॉप्टर शटल सर्व्हिस, डायनिंग, स्लेडिंग, ग्लेशियर ट्रेकिंग आणि माउंटेनियरिंगचा खर्च देखील सामील असेल.
हॉटेलचा खर्च अधिक असला तरीही जगातील निर्जन कोपऱयात राहण्याची एक वेगळीच मजा असते. येथे एकावेळी केवळ 10 लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था आहे. दिवसाच्या वेळी हिमाच्छादित पर्वत दिसून येतात. तर रात्रीचे दृश्य मोहक असते. रुफटॉपवर सोनाबाथची व्यवस्था आहे. तर अलास्कन शेफनी तयार केलेले खाद्यपदार्थ येथे मिळतात. हॉटेल उभारण्याची अनुमती मिळविण्यास त्याच्या मालकांना 10 वर्षांचा कालावधी लागला आहे.