Tarun Bharat

पुढील वर्षापासून कारमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य- नितीन गडकरी

Advertisements

नवी दिल्ली : “ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्याचा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन 01 ऑक्टोबर 2023 पासून कारमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे.” असे केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे.

परिवहन मंत्रालया्च्या वेबसाइटनुसार M1 श्रेणी म्हणजे प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहने होय. ज्यात चालकाच्या आसनासह आठ पेक्षा ज्यादा जागा नसतात. केंद्र सरकारने या वर्षी १ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची योजना आखली होती.

आपल्या पोस्टमध्ये अधिक माहिती देताना गडकरी म्हणाले “ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, 01 ऑक्टोबर 2023 पासून पॅसेंजर कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,”. या निर्णयाद्वारे मोटार वाहनामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला अग्रक्रम देऊनच हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Related Stories

उत्तर प्रदेशात ‘जम्बो’ एअरपोर्टची पायाभरणी

Amit Kulkarni

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Abhijeet Shinde

माजी केंद्रीय मंत्री अकबर यांना झटका

Patil_p

पंजाबचे मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

जुनी कार स्क्रॅप केल्यास नव्या कारवर 5 टक्के सूट

datta jadhav

भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन ; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!