पहिल्या पाच रेल्वेस्थानकांमध्ये समावेश : नैर्त्रुत्य रेल्वेकडून यादी जाहीर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱयांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. मे अखेरपर्यंत बेळगाव रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीतून 6 कोटी 84 लाख रुपयांचा महसूल रेल्वेकडे जमा झाला आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वे विभागात पहिल्या पाच रेल्वेस्थानकांमध्ये बेळगावचा समावेश झाला आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेने 1 जानेवारी ते 31 मे यादरम्यान जमा झालेल्या महसुलाची रेल्वेस्थानकांसह यादी जाहीर केली आहे. बेंगळूर रेल्वेस्थानकाचा 20.16 कोटी, हुबळी 17.11 कोटी, यशवंतपूर 9.64 कोटी, म्हैसूर 9.36 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. बेळगाव पाचव्या स्थानी असून 6.84 कोटी महसूल जमा झाला. म्हैसूर व यशवंतपूर यांचा पॅसेंजर रेल्वेचा महसूल अधिक असल्यामुळे ते बेळगावपेक्षा पुढे असल्याचे आकडेवारीनुसार समोर येत आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकात आरक्षित तिकिटांमधून 6.20 कोटी महसूल जमा झाला आहे. तर अनारक्षित तिकिटांमधून 64 लाख रुपये महसूल मिळाला आहे. बेळगावमधून सध्या 36 एक्स्प्रेस धावत असल्यामुळे हा महसूल जमा होत आहे. एक्स्प्रेस व पॅसेंजरची संख्या वाढल्यास महसूल दुपटीने वाढण्याची शक्मयता आहे. सध्या बेळगावमधून दिल्ली, एर्नाकुलम, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, गोवा, बेंगळूर, तिरुपती या शहरांना रेल्वेने जोडल्याने महसूल मिळत आहे.
पॅसेंजर सुरू झाल्यास महसुलात होणार वाढ
बेळगाव परिसरात रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याने पॅसेंजर रेल्वे बंद ठेवल्या आहेत. बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर वगळता इतर सर्व पॅसेंजर बंद असल्याने त्याचा परिणाम महसुलावर होत आहे. बेळगाव वगळता इतर महत्त्वाच्या रेल्वे विभागात पॅसेंजर सुरू असल्यामुळे महसूल वाढत आहे. बेळगावमध्ये पॅसेंजर सुरू झाल्यास बेळगाव रेल्वेस्थानक नैर्त्रुत्य रेल्वे विभागात तिसऱया स्थानी जाईल, अशी शक्मयता आहे.