अहमदाबाद :
गुजरातच्या भरूच जिल्ह्यात दोन मुलांसमवेत एकाच कुटुंबातील सहाजण समुद्रात बुडाले आहेत. वागरा तालुक्यातील मुलर गावानजीक गांधार समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. या समुद्रकिनाऱ्यावर एक कुटुंब पिकनिकसाठी पोहोचले होते. कुटुंबाच्या 8 सदस्यांपैकी 6 जण समुद्रात बुडाले असून दोघांना स्थानिकांनी वाचविल्याची माहिती पोलीस अधीक्षक लिना पाटील यांनी शनिवारी दिली आहे.