बेतकी खांडोळातून संजीवनी तळेकर बिनविरोध : 58 अर्ज मागे : शिरोडय़ातील प्रभाग 7 मध्ये सर्वाधिक 9 उमेदवार
प्रतिनिधी /फोंडा
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बुधवारी फोंडा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीमधून 58 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 602 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बेतकी-खांडोळा पंचायतीच्या प्रभाग 1 मधून संजीवनी खुशाली तळेकर या महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या. सर्वांधिक 9 उमेवार शिरोडा पंचायतीच्या प्रभाग 7 मधून लढणार आहेत.
कवळे पंचायतीच्या 9 प्रभागामधून मधून 26 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 5 उमेदवार प्रभाग 7 मधून लढणार आहेत. वाडी-तळावली पंचायतीच्या 7 प्रभागामधून 16 उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 3 उमेदवार प्रभाग 1 व 2 मधून रिंगणात आहेत. भोम-अडकोण पंचायतीच्या 7 प्रभागामधून 23 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 5 प्रभाग 6 मधून लढणार आहेत. बांदोडा पंचायतीच्या 11 प्रभागामधून 43 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 8 उमेदवार प्रभाग 6 मधून लढतील. कुंडई पंचायतीच्या 7 प्रभागामधून 24 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 5 उमेदवार प्रभाग 2 मधून लढतील.
दुर्भाट पंचायतीच्या 7 प्रभागामधून 22 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 3 व प्रभाग 7 मधून लढतील. मडकई पंचायतीच्या 9 प्रभागातून 37 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 6 उमेदवार प्रभाग 5 व प्रभाग 7 मधून लढणार आहेत. बेतकी-खांडोळा पंचायतीच्या 9 प्रभागांमधून 37 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 8 उमेदवार प्रभाग 3 मधून लढणार आहेत. याच पंचायतीच्या प्रभाग 1 मधून संजीवनी खुशाली तळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या 11 प्रभागामधून एकूण 49 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 6 उमेदवार प्रभाग 2, 4, 7 व 8 या प्रभागामधून लढणार आहेत. उसगांव-गांजे पंचायतीच्या 11 प्रभागामधून 50 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक 7 उमेदवार प्रभाग 3 मधून लढतील. केरी पंचायतीच्या 7 प्रभागामधून 20 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 3 व प्रभाग 7 मधून लढणार आहेत. तिवरे-वरगाव पंचायतीच्या 9 प्रभागामधून 30 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 7 उमेदवार प्रभाग 3 माधून लढणार आहेत. वेरे-वाघुर्मे पंचायतीच्या 7 प्रभागामधून 18 उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 4 मधून लढतील. वळवई पंचायतीच्या 5 प्रभागामधून 15 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 1 व प्रभाग 2 मधून लढणार आहेत.
वेलिंग-प्रियोळ-कुंकळय़े पंचायतीच्या 11 प्रभागातून 41 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 8 उमेदवार प्रभाग 2 मधून लढणार आहेत. बोरी पंचायतीच्या 11 प्रभागामधून 42 उमेवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 5 उमेदवार प्रभाग 3, 4, 8 व 9 मधून लढणार आहेत. बेतोडा-निरंकाल पंचायतीच्या 11 प्रभागामधून 42 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 5 उमेदवार प्रभाग 5, 7 व 8 मधून लढणार आहेत. पंचवाडी पंचायतीच्या 7 प्रभागामधून 25 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 4 उमेदवार प्रभाग 1, 4, 5 व 6 मधून रिंगणात आहेत. शिरोडा पंचायतीच्या 11 प्रभागातून 42 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सर्वाधिक 9 उमेदवार प्रभाग 7 मधून लढणार आहेत.