वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या दहापैकी 5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात शेअरबाजारात 62,586 कोटी रुपयांची घसरण अनुभवायला मिळाली. आयटी क्षेत्रातल्या कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिस या तोट्यात होत्या.
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 180 अंकांनी घसरला होता तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 35 अंकांनी घसरणीत होता. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल मूल्य 26,308 कोटी रुपयांनी कमी झाले तर इन्फोसिसचे 25,296 कोटी रुपयांनी कमी झाले होते. यासोबत रिलायन्स इंडस्ट्रिजचे मूल्य 5101 कोटी, हिंदुस्थान युनिलिव्हरचे 3865 कोटींनी कमी झाले होते. एचडीएफसी बँकेचे मूल्यसुद्धा 2008 कोटी रुपयांनी घटले. दुसरीकडे बजाज फायनान्सच्या मूल्यात 20,413 कोटी रुपयांची वाढ झाली.