रशियाच्या संरक्षण मंत्रालयाची पुष्टी ः युक्रेनकडून क्षेपणास्त्र हल्ले
वृत्तसंस्था / मॉस्को
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात 63 रशियन सैनिक मारले गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. युक्रेनकडून रशियानियंत्रत मकीवका शहरात क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यापूर्वी रशियाकडून नववर्षाच्या पूर्वसंध्येवेळी युक्रेनवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले करण्यात आले होते.
युक्रेनकडून डोनबास भागात एका सैन्यतुकडीला क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य करण्यात आले. ब्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या रोस्तोव क्षेत्रात सैनिकांसमोर नववर्षाचा संदेश चित्रित केला होता. या ठिकाणापासून 115 मैल अंतरावर युक्रेनकडून घातक हल्ला करण्यात आला आहे. रशियाने या हल्ल्यात मारले गेलेल्या सैनिकांचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला. तर रशियाचे 400 सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.
युक्रेनमधील युद्धात रशियाने 1 हजाराहून अधिक एफएसबी गुप्तसेवा अधिकाऱयांना गमाविले आहे. 10 महिन्यांमध्ये रशियाच्या जीवितहानीचा आकडा 1,45,000 वर पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा आकडा पेमलिनमधूनच समोर आला असल्याचा दावा एका पाश्चिमात्य प्रसारमाध्यमाने केला आहे. युक्रेनने सोमवारी हिमार्स क्षेपणास्त्रांनी हल्ल्sढ करत मकीवका शहरातील रशियाच्या सैन्यतुकडीला लक्ष्य केले. या हल्ल्यात रशियन कमांडर्ससह मोठय़ा संख्येत सैनिक मारले गेले आहेत.