Tarun Bharat

64 वर्षीय मॅडोना पुन्हा प्रेमात

Advertisements

41 वर्षांनी लहान युवकाला करतेय डेट

जगातील सर्वात चर्चेत राहणारी पॉप सिंगर मॅडोनाने स्वतःच्या कारकीर्दीतील 40 वर्षांचे स्मरण करत रीमिक्स अल्बम प्रदर्शित केला आहे. तसेच तिने एका मुलाखतीत स्वतःचे जीवन अन् कारकीर्दीशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

64 वर्षीय मॅडोना आजही प्रसिद्धीच्या झोतात असते. दोन विवाह केलेल्या मॅडोना स्वतःच्या पतींपासून विभक्त झाली आहे. सध्या ती स्वतःपेक्षा 41 वर्षांनी लहान असलेल्या युवकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मॅडोना 6 मुलांची आई आहे. तिच्या सर्वात मोठय़ा मुलाचे वय तिच्या प्रियकरापेक्षा दोन वर्षांनी अधिक आहे. मॅडोना सध्या 23 वर्षीय एंड्रू डारनेलला डेट करत आहे. एंड्रू एक मॉडेल आहे. मॅडोनाला मुलाखतीत कुठल्या गोष्टीचा पश्चाताप वाटतो असे विचारले असता तिने दोन विवाह करण्याचा पश्चाताप असल्याचे उत्तर दिले आहे.

मॅडोनाने पहिला विवाह अमेरिकन अभिनेता सीन पॅनसोबत केला होता. हा विवाह 1985-89 पर्यंत टिकला. पॅनकडून घटस्फोट घेतल्यावर तिने अमेरिकन दिग्दर्शक गाय रिचीसोबत 2000 साली विवाह केला होता. हा विवाह 8 वर्षे चालला आणि 2008 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. अमेरिकेत मॅडोनाची प्रतिमा बंडखोर महिलेची आहे. तिने कधीच कुठल्या गोष्टीची पर्वा केलेली नाही.

Related Stories

भिकाऱयांच्या मुलांसाठी सुरू केली शाळा

Amit Kulkarni

झारखंड : ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे नाही स्मार्टफोन, लढवली ‘ही’ शक्कल

Tousif Mujawar

पतीबरोबर बाजार, प्रियकराबरोबर फरार

Patil_p

लोकांची मनं जिंकून घेणारी कृती

Amit Kulkarni

आकाशातून उंदरांवर पाडविले जाणार विष

Patil_p

सदाबहार गीतांनी उलगडला संगीताचा सुवर्णकाळ

prashant_c
error: Content is protected !!