Tarun Bharat

नंदगड ग्राम पंचायतमध्ये 65 लाखांचा गैरव्यवहार

ग्रा. पं. उपाध्यक्ष मन्सूर ताशिलदार यांची माहिती : तीन दिवसात चौकशी करण्याची मागणी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा : पत्रकार परिषदेला 23 पैकी 19 सदस्यांची उपस्थिती

वार्ताहर /नंदगड

नंदगड ग्राम पंचायतीत 21 महिन्यांत 65 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष मन्सूर ताशिलदार यांनी दिली. या गैरव्यवहाराची चौकशी तीन दिवसांत व्हावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. ग्राम पंचायतीच्या 23 सदस्यांपैकी 19 सदस्य पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

उपाध्यक्ष मन्सूर ताशिलदार म्हणाले, आम्ही 21 महिन्यांपासून नंदगड पंचायतीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहोत. नंदगड ग्राम पंचायतीला घरपट्टी वसुलीच्या माध्यमातून महिन्याला साधारणतः तीन ते साडे तीन लाख रुपयाचा महसूल जमा होतो. एक वर्षाला सुमारे 44 लाख रुपये पंचायतीकडे येतात. आम्ही जेव्हा पदभार सांभाळला तेव्हा निधी नंबर दोनमध्ये 17 लाख रुपये शिल्लक होते. आज केवळ 26 हजार रुपये या खात्यावर शिल्लक आहेत. त्यामुळे यापूर्वीचे 17 लाख शिल्लक रक्कम तसेच 21 महिन्यात जमा झालेली करवसुलीची रक्कम याची गोळाबेरीज केली असता अंदाजे 65 लाखांचा आर्थिक निधी खात्यात असणे गरजेचे होते. मात्र हा निधी कोठे वापरला गेला? याबाबतचा खुलासा मागितला असता अद्याप ही रक्कम कोठे खर्च केली, याचा जमाखर्च देण्यात आलेला नाही. त्यामुळे पंचायतीत गैरव्यवहार झाल्याची खात्री आहे.

याबाबत आम्ही पीडीओ भिंगे यांच्याकडे जमा-खर्चाची मागणी केली असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. जेव्हा जमाखर्च व कॅशबुकमध्ये पाहणी केली असता मोठय़ा प्रमाणात तफावत आढळून आली. यानंतर आम्ही पंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहाराच्या वहय़ा जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी दर्शन यांच्याकडे चौकशी करण्यासाठी सुपूर्द केल्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱयांनीदेखील याबाबत कोणतीच चौकशी अथवा कारवाई केलेली नाही. यामुळे आम्हास आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. जर येत्या तीन दिवसात या भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रा. पं. सदस्य एम. एम. काजी माहिती देताना म्हणाले, दोन वर्षापूर्वी  अंत्योदय सर्वेक्षणात नंदगड ग्राम पंचायतीचा पाचवा क्रमांक होता. असे असताना सध्याचे पिडीओ आनंद भ्sिंागे यांनी व्यवस्थितरित्या जमा-खर्चाची नोंद केली नाही. ते केवळ सर्वांची दिशाभूल करीत आहेत. ग्राम विकासाचा 4 लाखाचा निधी मासिक बैठकीत ठराव पास न करता किंवा कोणत्याही वरि÷ अधिकाऱयांची परवानगी न घेता तो निधी नंबर दोनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. नंदगड ग्राम पंचायतीतर्फे गावातील एखादी व्यक्ती मृत पावल्यास ग्राम पंचायतीतर्फे अंत्यविधीसाठी निधी क्रमांक दोनमधून अडीच हजार रुपये देण्यात येत होते. ती योजनाही अलीकडे बंद करण्यात आली आहे. तसेच अत्यल्प दरात घरोघरी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. हा शुद्ध पाणीपुरवठाही बंद करून या वाहनावरील चालकालाही कामावरून कमी करण्यात आले आहे.

ग्राम पंचायत सदस्या वैष्णवी पाटील म्हणाल्या, मी स्वतः ग्राम पंचायत सदस्य असूनही ग्राम पंचायतीच्या व्यवहाराची माहिती वारंवार मागणी करून देखील मला देण्यात येत नव्हती. त्यामुळे मी माहिती हक्क अधिकाराखाली सदर माहिती मागवली आहे. माझ्यासारख्या सदस्याची ही गत तर सर्वसामान्यांची काय असेल? असा प्रश्नही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

या गैरव्यवहारामध्ये अडकलेल्या दोषींवर कारवाई करून नंदगडवासियांना न्याय द्यावा, अशीच मागणी ग्राम पंचायत सदस्य नागो पाटील यांनी केली.

अनुसूचित जाती-जमातीसाठी कोणकोणत्या योजना अंमलात आल्या आहेत व त्यासाठी किती निधी आला आहे? याची कल्पनाच नसल्याची खंत ग्राम पंचायत सदस्य चंद्रू वड्डर यांनी व्यक्त केली. यावेळी लक्ष्मण बोटेकर, दीपा फातर्डे, सुजाता हुलबुत्ते, निता देगावकर, नसीमा बेगम हेरेकर, संदीप पारिश्वाडकर, प्रदीप कुमार पवार, अखिल चंदगडकर, प्रणाली तोरगल, बसव्वा हत्तरवाड, निर्मला जोडंगी, संगीता दोड्डमणी, सिद्धाप्पा नाईक आदींसह 19 सदस्य उपस्थित होते.

Related Stories

‘आठवडी’मध्ये निर्बंध, ‘घाऊक’मध्ये फज्जा

Omkar B

जमखंडी नगराध्यक्षपदासाठी दोन सदस्यांमध्ये स्पर्धा

Patil_p

शहापूर येथील हॉस्पिटलवर समाजकंटकांचा हल्ला

Amit Kulkarni

उद्योगाच्या संधींमध्ये महिलांना अग्रक्रम आवश्यक

tarunbharat

डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव साजरा करणार

Amit Kulkarni

शिवराज हायस्कूलच्या वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni