कमिशन देण्याच्या बहाण्याने फसवणूक
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरालगतच्या मिरजोळे कालिकानगर येथे कमिशन देण्याचे लालच दाखवून महिलेला 66 हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल़ा ही घटना दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 2022 रोजी घडल़ी. अनिशा स्वामिदत्त रूमडे (ऱा मिरजोळे रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आह़े या पकरणी अनिशा यांनी शहर पोलिसात तकार दाखल केल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर 2022 रोजी अनिशा याच्या मोबाईलवरील व्हॉटसऍप वर संशयिताने लिंक पाठविली होत़ी या लिंकवर एक टास्क देण्यात आली होत़ी ही टास्क पूर्ण केल्यास कमिशन मिळेल. अशी बतावणी करण्यात आली होत़ी. मात्र टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यासाठी संशयिताकडून सांगण्यात आले होत़े. त्यानुसार अनिशा यांनी संशयिताने दिलेल्या खात्यामध्ये 66 हजार रूपयांची रक्कम पाठविल़ी. पैसे भरल्यानंतरही कोणतेही कमिशन पाप्त न झाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे अनिशा यांना लक्षात आल़े. त्यानुसार त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत अज्ञात संशयितांविरूद्ध तकार दाखल केल़ी. पोलिसांनी यापकरणी अज्ञातांविरूद्ध भादवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आह़े.