तरीही 87 वर्षीय वृद्ध पूर्णपणे तंदुरुस्त
हिवाळय़ात आंघोळ करणे कुणालाही अवघड काम वाटत असते. तरीही लोक हा दिनक्रम उरकून घेतात. परंतु एका व्यक्तीने मागील 67 वर्षांपासून स्नान केलेले नाही. हा व्यक्ती इराणचा रहिवासी असून त्याचे नाव अमो हाजी आहे. 87 वर्षीय अमो हाजीने मागील 67 वर्षांमध्ये स्वतःच्या शरीरावर पाणी देखील ओतलेले नाही. याचमुळे त्याला जगातील सर्वात अस्वच्छ व्यक्ती म्हटले जाते.
पाण्याची भीती वाटत असल्याने अमो हाजी आंघोळ करत नाहीत. आंघोळ केल्यास आजारी पडू अशी भीती त्यांना सतावते. सफाईमुळे आजारी पडणार असल्याचे त्यांचे मानणे आहे. स्नान न केल्याने त्यांचा चेहरा काळा पडला असून त्यांचे पूर्ण शरीर दुर्गंधयुक्त झाले आहे. त्यांच्या जवळ कुणीच उभा राहू शकत नसल्याने ते इराणच्या वाळवंटात एकटे रहायचे. 87 वर्षीय हाजी सध्या देजगाह गावात एका झोपडीत राहतात. स्थानिक लोकांनी त्यांना ही झोपडी तयार करून दिली आहे.
अमो हाजी दिवसभरात 5 लिटर पाणी पितात. स्वच्छ राहणे त्यांना आवडत नाही. याचमुळे ते नासलेले अन्नही खात असतात. केवळ मृत प्राण्यांचे सडलेले मांस ते खातात आणि तलावाचे पाणी पित असतात.
थंडीत ते युद्धादरम्यान वापरले गेलेल्या जुन्या हेल्मेटचा वापर करतात. कपडय़ांचा एकच जोड ते अनेक वर्षांपासून घालत आहेत. नवे कपडे मिळाल्यास ते जुन्या कपडय़ांवर घालून घेतात.
एकटे राहणारे अमो हाजी धूम्रपान देखील करतात. डॉक्टरांनी त्यांच्या झोपडीची पाहणी आणि अमो यांच्या आरोग्याची तपासणी केली असता ते अवाप् झाले. अमो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे त्यांना तपासणीत आढळून आले. त्यांच्या शरीरात कुठलाच बॅक्टेरिया किंवा गंभीर आजार नव्हता. ते एका अत्यंत स्वच्छ घरात राहणाऱया माणसाइतकेच तंदुरुस्त होते. तेहरानमधील स्कुल ऑफ पब्लिक हेल्थमधील सहाय्यक प्राध्यापकाने त्यांची वैद्यकीय पाहणी केली होती. सडलेले अन्न खाऊन आणि 67 वर्षे स्नान न करता राहिल्यावरही हाजी यांच्या शरीरात कुठलाच बॅक्टेरिया नव्हता याची पुष्टी त्यांनी दिली.
अमो हाजी यांचा परिसरातील लोक आदर करतात. परंतु काही लोक त्यांना दूषणे देखील देत असतात. स्थानिक प्रशासन त्यांना मदत करत असते. स्थानिक गव्हर्नरांनी अमो हाजी यांना एकटे सोडण्याचे आवाहन केले आहे.