Tarun Bharat

सासष्टीत 68.33 टक्के मतदान

कोणत्याही अनुचित घटनेची नोंद नाही

प्रतिनिधी /मडगाव

सासष्टी तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी काल शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. मतदारांमध्ये विशेष असा उत्साह दिसून आला नाही. मतदानाची टक्केवारी 68.33 येवढीच राहिली. सासष्टीत एकूण 863 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत आणल्याने मतदानाची टक्केवारी 60 टक्क्याहून पुढे गेली. अन्यथा टक्केवारी आणखीन घसरण्याची शक्यता होती.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था बीएलओ मार्फत केली होती. तशी व्यवस्था यावेळी करण्यात आली नसल्याने असंख्य ज्येष्ठ नागरिकांना मनात इच्छा असूनही मतदान करता आले नाही. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था केली पाहिजे होती अशी प्रतिक्रीया अनेक उमेदवारांनी व्यक्त केली.

काल सकाळी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. मात्र, सकाळी काहींसे पावसाळी वातावरण असल्याने मतदार घरातून बाहेर पडण्यास विलंब झाला. त्यामुळे सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत बऱयाच मतदान केंद्रावर 35 ते 40 टक्क्या पर्यंत मतदान झाले होते. दुपारी पावसाने विश्रांती घेतल्याने मतदार घरातून बाहेर पडून मतदान करताना आढळून आले.

हाऊसिंग बोर्ड मतदान केंद्रावर कंमाडो

सासष्टीत नावेली मतदारसंघातील हाऊसिंग बोर्ड येथील अंजूमन हायस्कूलमधील मतदान केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर तणाव होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी या ठिकाणी बंदूकधारी कंमाडो तैनात केले होते. त्याच बरोबर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे हे स्वता या ठिकाणी एकूण परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.

या मतदान केंद्राच्या बाहेर मोठय़ा संख्येने उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र, या समर्थकांना मतदान केंद्राजवळ येण्यापासून पोलिसांनी रोखून धरले होते. रूमडामळ पंचायतीच्या काही प्रभागांनी अटीतटीच्या लढती होत असल्याने उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला.

बेतालभाटी पोलीस बंदोबस्त

बेतालभाटी मतदान केंद्रावरही पोलीस तैतान करण्यात आले होते. या ठिकाणी माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चूरस निर्माण झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत या मतदान केंद्रावर तणाव असतो. मात्र, यावेळी अगदी शांततापूर्ण वातावरण होते. पण, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस तैनात करण्यात आले होते.

आमदारांची लागणार कसोटी

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जरी पक्षाच्या निशाणीवर होत नसल्या तरी मतदारसंघातील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आमदार या निवडणुकीत सक्रीय झाले होते. काही आमदार प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेताना आढळून आले. जे पंच सदस्य निवडून येतील ते आपलेच असतील अशा प्रतिक्रीया या आमदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.

Related Stories

आमदार अपात्रता प्रकरणी निवाडा राखून

Amit Kulkarni

डिचोलीच्या उमेदवारीवर यावेळी आपलाच हक्क

Patil_p

अकरा आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची

Amit Kulkarni

भाजीमाल वाहतूकीच्या बनावटगिरीतील “मास्टरमाइंड” कोण ?

Omkar B

खैर झाडांची बेकायदेशीर कत्तलप्रकरणी पाचजणांना अटक

Amit Kulkarni

…तर सांगेत शेळ – मेळावलीची पुनरावृत्ती अटळ : पाटकर

Omkar B