Tarun Bharat

अमेरिकेत 68 टक्के लोक अनिद्रेने ग्रस्त

Advertisements

प्रत्येकी 5 पैकी एक व्यक्ती रात्री झोपू शकत नाही, महागाईमुळे वाढतोय तणाव

कोरोना संकटानंतर आता महागाईने अमेरिकेतील नागरिक त्रस्त आहेत. याचमुळे दर 5 पैकी एक अमेरिकन नागरिक रात्री निवांत झोपू शकत नसल्याचा खुलासा ओहायो विद्यापीठाच्या वैद्यकीय केंद्रात अलिकडेच झालेल्या संशोधनातून झाला आहे. अमेरिकेचे लोक आतापर्यंतच्या सर्वात अधिक तणावाला तोंड देत आहेत. 68 टक्के लोकांना तणावामुळे झोप येत नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

2018-21 दरम्यान झोप न लागणाऱया लोकांच्या संख्येत 29 टक्के वाढ जाली आहे. तणावामुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो. यामुळे रक्तदाब अन् स्नायू ताणले जाण्याची स्थिती निर्माण होते आणि लोकांना झोप लागत नाही. अशा स्थितीत समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे इंटरनल मेडिसीनच्या प्राध्यापिका डॉ. अनीसा दास यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे नागरिक रात्री सरासरी 5 तास झोपत असतात. तर आठवडय़ात 3 दिवस झोप न येण्याच्या समस्येला तोंड देत असतात.

रात्री मोबाइल, टीव्ही स्क्रीन पाहणे घातक

अमेरिकेत केवळ 8 टक्के लोकांनाच आपली पूर्ण झोप होत असल्याचे वाटते. 50 टक्के लोक झोपण्यापूर्वी मोबाइल हाताळत असतात. तर 37 टक्के लोक टीव्ही पाहत झोपी जातात. रात्री फोन किंवा टीव्हीमुळे पडणारा प्रकाश आमच्या बॉडीक्लॉकची दिशाभूल करतो आणि यामुळे आम्ही रात्री योग्यवेळी झोपू शकत नाही. झोप न लागणे एखाद्या आजाराचे लक्षणही असू शकते. मोबाइल-टीव्हीच्या वापरापासून वाचणे आणि दिवसाच्या उन्हात बाहेर पडणे सहजपणे झोपण्यास मदत करू शकते असे डॉ. दास यांचे म्हणणे आहे.

खोलीत काळोख ठेवा

रात्री वेळेत झोपण्यासाठी आम्हाला बेडरुममध्ये काहीसे बदल करावे लागतील. बेडरुमचे तापमान कमी करावे लागले. खोलीत अधिकाधिक अंधार ठेवावा लागेल, यामुळे शांत राहण्यास चांगली झोप मिळू शकते, असे दास यांनी म्हटले आहे.

Related Stories

सैन्य माघारीवर एकमत

Patil_p

कजाकिस्तान भारताकडून खरेदी करणार लस

Patil_p

लिबियात सात भारतीयांचे अपहरण

datta jadhav

कोलंबसचा पुतळा प्रखर विरोधानंतर हटवला

Patil_p

चीनमध्ये लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

Patil_p

अब्जावधींचा रोजगार धोक्यात

Patil_p
error: Content is protected !!