Tarun Bharat

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत’ मराठीचा बोलबाला;’गोष्ट एका पैठणीची’आणि राहुल देशपांडेंना पुरस्कार जाहीर

68th National Film Awards : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards) आज (22 जुलै) घोषणा झाली. यात ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कारामागचा हेतू
मनोरंजन सृष्टीत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. चांगले सिनेमे तयार व्हावेत आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे हा या पुरस्कारामागचा हेतू आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक पुरस्कारासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी या पुरस्कारांची नावं आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींकडे सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत.

Related Stories

आपल्यासमोर आता गावांपर्यंत कोरोना पोहोचू न देण्याचे आवाहन : नरेंद्र मोदी

Tousif Mujawar

निवडणुकीत भाजप ओबीसींना प्राधान्य देणार

Archana Banage

केंद्राला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील – राहुल गांधी

Archana Banage

विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने प्रवास; संजय राऊतांच सूचक ट्विट

Archana Banage

सर्वात महागडी नेल पॉलिश

Amit Kulkarni

कणेरी येथील यश बेकरीमध्ये चोरी

Abhijeet Khandekar