Tarun Bharat

69 कामे बहुमताने नामंजूर करत सत्ताधाऱयांचा सेनेला शह

Advertisements

वार्ताहर/ राजापूर

शासनाच्या सुमारे 5 कोटीच्या ठोक निधीतून शिवसेनेने मंजूर करून आणलेली सुमारे 69 विकास कामे राजापूर नगर परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस आघाडीने बहुमताने नामंजूर करत शिवसेनेला शह दिला आहे. सोमवारी झालेल्या नगर परीषदेच्या बैठकीत भाजप नगरसेवकाच्या पाठींब्याने काँग्रेस आघाडीने आठ विरूध्द 9 मतांनी ही कामे नामंजूर केली आहेत. शहरातील महत्वपूर्ण रस्ते, पाणीपुरवठा योजना या सार्वजनिक कामांची यादी मंजूर करून ती कामे शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती या बैठकीनंतर नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे यांनी पत्रकारांना दिली आहे.

राजापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष ऍड.खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झुम ऍपद्वारे पार पडली. यावेळी शासनाच्या सुमारे पाच कोटी रूपये ठोक निधीतून शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या 69 कामांना देखभाल दुरूस्ती हमीपत्र व नाहरकत दाखला देणे हे महत्वपूर्ण विषय पत्रिकेवरील विषय चर्चेत आला असता नगराध्यक्ष ऍड.खलिफे यांनी ही सर्व कामे वैयक्तीक स्वरूपातील असून ती आम्हाला मान्य नाहीत, ती आम्ही नामंजूर करत आहोत, या निधीतून सार्वजनिक हिताची कामे झाली पाहिजेत, अशी मागणी करत तसा ठराव मांडला त्याला उपनगराध्यक्ष संजय ओगले यांनी अनुमोदन दिले.

त्यावर शिवसेना नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांनी उपसूचना मांडली, त्याला विरोधी गटनेते विनय गुरव यांनी अनुमोदन दिले. यावर मतदान घेण्यात आले असता काँग्रेस आघाडीने आठ विरूध्द नऊ मतांनी शिवसेनेचा कामे मंजूरीचा प्रस्ताव फेटाळून लावला. या बैठकीत दिव्यांगाना पाच टक्के निधीतून लाभ देणे यासह घनकचरा व्यवस्थापनात कर्मचारी घेणे, पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजूरी देण्यात आली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडी शासनाने हा निधी दिलेला आहे. मात्र असे असतानाही शिवसेनचे मंत्री, खासदार, आमदार आणि नगर परिषदेतील विरोधी गटनेते हे मनमानी करून शहतील सार्वजनिक हिताची कामे डावलून आपल्या मर्जीप्रमाणे वैयक्तीक स्वरूपातील कामांना या निधीतून प्राधान्य दिले आहे. हे आंम्हाला मान्य नसल्याने आम्ही ही सर्व कामे नामंजूर केल्याचे ऍड.खलिफे यांनी सांगितले. या निधीतून शहरातील शिवाजीपथ, कोंढेतड, भटाळीतील सरखोत मार्ग हे मुख्य रस्ते, शिळ जॅकवेलकडील नवीन पर्यायी पाणीपुरवठा वाहिनी टाकणे व अन्य कामे सुचविलेली असून ती यादी या सर्वसाधारण सभेत आम्ही मंजूर करून शासनाकडे पाठवल्याचे ऍड. खलिफे यांनी सांगितले.

Related Stories

‘तौत्के’ संकटात परप्रांतीय मच्छीमारांना कोकण किनारपट्टीचा आधार

Archana Banage

रत्नागिरी : कोयना अवजल प्रकल्प ठरणार रिफायनरीची पूर्वतयारी?

Archana Banage

अन्यथा प्रशासनाला सरपंचांकडून असहकार!

NIKHIL_N

परिचारीकेवर बलात्कार करणाऱया नराधमाला अटक

Patil_p

लॉकडाऊनमध्येही रोजगार हमी योजनेने दिले सामान्यांना काम

Patil_p

बिगर रेशनकार्डकारांना मोफत तांदूळ

NIKHIL_N
error: Content is protected !!