Tarun Bharat

69 हजार पेट्रोल पंपांवर ई-चार्जिंग कियोस्क

केंद्रीय परिवहन मंत्री गडकरींची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी 69 हजार पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग कियोस्क लावण्याची घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन तसेच महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी शक्य ती सर्व पावले सरकारने उचलली असल्याचे गडकरी म्हणाले.

पुढील 5 वर्षांमध्ये देशाला जागतिक ऑटोमोबाईल निर्मिती केंद्राचा मान मिळवून देण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राने डबल डेकर बसेसच्या निर्मितीच्या दिशेनेही काम करावे. केंद्र सरकार दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला इलेक्ट्रिक महामार्ग म्हणून विकसित करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पेट्रोल पंपांवर पर्यायी इंधन

चार्जिंग सुविधेच्या अभावी सध्या लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नव्या दिशानिर्देशांनुसार नव्या पेट्रोल पंपांवर किमान एक पर्यायी इंधन असणे अनिवार्य आहे. दिशानिर्देशांच्या अंतर्गत पेट्रोल पंप पर्यायी इंधन म्हणून व्हेइकल चार्जिंग सुविधा उपलब्ध करत आहेत. तर अस्तित्वात असलेल्या पेट्रोल पंपांवर ईवी चार्जिंग कियोस्क लावण्यात आल्यास मोठा बदल घडणार असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

Related Stories

राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ ‘लोकप्रिय’

Patil_p

योगी आदित्यनाथांचा 25 रोजी शपथविधी

Amit Kulkarni

गुरुद्वारा नमाज पठणासाठी देणार जागा

Archana Banage

रब्बी हंगामाच्या पेरणीतही अवकाळीचा अडथळा

Patil_p

रोजगार देण्याऱया शिक्षणावर भर

prashant_c

जम्मू-काश्मीरमध्ये प्रवाशी बस उलटली, 25 जखमी

datta jadhav