ऑनलाईन टीम / प्रयागराज :
उत्तर प्रदेश सरकारकडून सोमवारी रात्री उशिरा 9 जिल्ह्यांच्या एसएसपी सोबत 14 आय पी एस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये 69 हजार शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाचा खुलासा करणारे पोलीस अधिकारी सात्यार्थ अनिरुद्ध पंकज यांचे देखील नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात्यार्थ अनिरुद्ध पंकज यांचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये टाकण्यात आले असून त्यांच्या जागी आय पी एस अभिषेक दीक्षित यांना प्रयागराजचे नवीन एसएसपी करण्यात आले आहे.
दरम्यान, 69 हजार सहायक शिक्षक भरती घोटाळा प्रकरण सात्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी उघड केले होते. या प्रकरणाची चौकशी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली होती. त्यामध्ये कॉपी करणाऱ्या नेटवर्कला उध्दवस्त केले होते. त्यात अशोक वेंकटेशं आणि अनिल यादव, कॉपी माफिया कृष्ण लाल पटेल आदी आरोपींना गजाआड केले होते.
सात्यार्थ अनिरुद्ध पंकज यांच्या बदली नंतर उत्तर प्रदेश मधील शिक्षक भरतीच्या उमेदवारांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका केली आहे.