बेंगळूर : राज्य सरकारने बुधवारी 7 आयएएस अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. बेंगळूर शहर परिवहन मंडळाच्या संचालक सी. शिखा यांची बेंगळूर वाणिज्य कर खात्याच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अजय नागभूषण यांची नगरविकास खात्याच्या सचिवपदी आणि सलमा फातिमा यांची बेंगळूरच्या पायाभूत सुविधा विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केपीएससी परीक्षा नियंत्रक म्हणून कनगवल्ली यांची वर्णी लावण्यात आली आहे. दरम्यान वाणिज्य कर खात्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी रघुनंदन मूर्ती, बेंगळूरच्या केईटीचे सदस्य म्हणून एम. एस. अर्चना आणि परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदी रम्या यांची बदली करण्यात आली आहे.
Previous Articleप्रदेश युवा काँग्रेस अध्यक्षपदी रक्षा रामय्याच
Next Article राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : नारायणगौडा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.