मुंबई
बाजार भांडवलात आघाडीवरील 10 पैकी 7 कंपन्यांनी गेल्या आठवडय़ात 1 लाख 31 हजार 173 कोटींची भर घातली आहे. या यादीत हिंदुस्थान युनीलिव्हर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपन्या निधी उभारण्यात आघाडी राखून होत्या. यासह बजाज फायनान्स, एचडीएफसी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड व विप्रो यांच्या बाजार भांडवलात वृद्धी झाल्याचे दिसले तर स्टेट बँक, एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक यांचे भांडवल घटले आहे.