वृत्तसंस्था/ मुंबई
चालू महिन्यात जवळपास 11 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 7 जुलै रोजी दोन आयपीओ सादर होण्याचे संकेत आहेत. यामध्ये पुण्याची क्लीन सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी आणि जी.आर.इन्फ्रा कंपनीचा समावेश आहे.
क्लीन सायन्सचा आयपीओ सात जुलै रोजी खुला होणार असून 9 जुलैला बंद होणार आहे. क्लीन सायन्सने 880 ते 900 रुपये इतका भाव निश्चित केला आहे. ही कंपनी प्रामुख्याने विशेष रसायन बनविणारी आहे. जी.आर.इन्फ्राचाही आयपीओ सात जुलै रोजी खुला होणार आहे. याचे मूल्य हे 828 ते 837 रुपये ठेवणार असल्याची माहिती आहे. या कंपनीला 963 कोटी रुपये बाजारातून उभारायचे आहेत. क्लीन सायन्स कंपनीच्या समभागालाही बाजारात चांगली मागणी राहिली आहे.