24 तास अन्न-पाण्याची व्यवस्था
नागौरमध्ये देशातील पहिल्या कबूतरशाळेत पक्ष्यांसाठी 7 मजली बंगला तयार करण्यात आला आहे. यात विविध मजले आणि फ्लॅटच्या हिशेबाने एकाचवेळी सुमारे 3 हजार पक्ष्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. तर टॉवरखाली उभारण्यात आलेल्या स्टँडवर 24 तास पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था असणार आहे.
चंचलदेवी बालचंद लुणावत ट्रस्ट अजमेरकडून पीह गावात उभारण्यात आलेल्या या 65 फूट उंच 7 मजली बर्ड हाउसवर सुमारे 8 लाख रुपयांचा खर्च करण्या आला आहे. 26 जानेवारी रोजी याचे उद्घाटन होणार आहे.
देशातील पहिली कबूतरशाळा
नागौर जिल्हय़ा अरावली पर्वतरांगेच्या पायथ्याला वसलेल्या पीह गावात देशातील पहिली सुव्यवस्थितत कबूतरशाळा देखील चालविली जाते. आता त्याच्याच परिसरात अन्य पक्ष्यांसाठी हा 7 मजली टॉवर उभारण्यात आला आहे. तसेच तेथे मुलांसाठी उद्यान आणि वृद्धांसाठी प्रार्थना कक्षही आहे. गावातील वृद्ध लोक कबुतरांना दाणे टाकल्यावर तेथे भजन-किर्तन करतात. परिसरात 400 रोपांची लागवड करण्यात आली आहे. दिवसाला 5-6 पोत्यांमध्ये मावेल इतके धान्य कबूतरांसाठी वापरले जाते.
दर महिन्याला 3 लाखांचा खर्च
कबूतरशाळेसाठी दर महिन्याला सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च केला जातो. तर बर्ड हाउस उभारल्याने पक्ष्यांसाठीचा खर्चही वाढणार आहे. पक्षी घरासोबत पक्ष्यांना प्यायला पाणी मिळावे म्हणून एक वॉटर पूलही निर्माण करण्यात आला आहे.