Tarun Bharat

7-11 वर्षांच्या मुलांना मिळणार ‘कोवोव्हॅक्स’

Advertisements

आपत्कालीन वापरासाठी शिफारसः ‘सीरम’च्या प्रयत्नांना यश

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लवकरच कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या देशात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता पुढील टप्प्यात भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) तज्ञ समितीने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करण्याची शिफारस केली आहे. साहजिकच काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही लस 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना लागू करता येईल.

सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या या लसीचे नाव कोवोव्हॅक्स असे आहे. लवकरच लहान मुलांनाही कोरोनाची लस मिळणे सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनीने कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली होती. त्यानुसार सध्या तज्ञ समितीने 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यास मान्यता दिली आहे. लवकरच त्याला ‘डीजीसीआय’कडून अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

सीरम इन्स्टिटय़ूटने 16 मार्च रोजी यासाठी अर्ज केला होता. गेल्या महिन्यात तज्ञ समितीने कंपनीकडे आणखी काही डेटाची मागणी केली होती. डीजीसीआयने गेल्या वषी विशेष परिस्थितीत प्रौढांना देण्यात येणाऱया कोवोव्हॅक्स लसीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. यानंतर यावषी 9 मार्च रोजी 12 ते 17 वर्षे वयोगटातील बालकांना विशेष परिस्थितीत ही लस देण्याची परवानगी देण्यात आली होती.

Related Stories

श्रीलंकेशी केलेला पेट्रोलियम करार कायम

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट परिसरात दुर्घटना

Amit Kulkarni

ड्रोन वापराबाबत मार्गदर्शक तत्वे जारी

datta jadhav

‘तुकडे-तुकडे टोळी’वर हल्लाबोल

Patil_p

जनधन खात्यांमुळे गुन्हय़ांमध्ये घट

Patil_p

गुजरातमध्ये ३ हजार किलो ड्रग्ज सापडल्यानंतर अमित शाह यांचा मोठा निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!