सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहूनच आरोपीनी केले कृत्य
प्रतिनिधी / मडगाव
सुरक्षा रक्षक नसल्याचे हेऊन आरोपीने एका खासगी बँकेचे एटीएम चोऊन व नंतर ते फोडून आतील सुमारे 7.83 लाखाची रक्कम लंपास केली. आरोपीचा माग घेण्यासाठी काही पालीस पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक गोव्याबाहेरील राज्यात पाठवण्यात आले असून तपास जोरात चालू आहे.
रावणफोंड-मडगाव येथील आयसीआयसीआय बँकेचे हे एटीएम फोडण्यात आले.या जागी सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून आरोपीनी या एटीएमकडे लक्ष केंद्रीत केले होते. या एटीएममध्ये किती रक्कम असेल याची कल्पना आरोपीना नसावी. मात्र लाखो ऊपये असेल हे गृहीत धऊनच या आरोपीनी एटीएम मशीन उखडण्यापूर्वी बराच अभ्यास केलेला असावा, या निष्कर्षप्रत तपास यंत्रणा पोहोचलेली आहे.
एटीएम यंत्र उखडण्यापूर्वी आरोपीने रावणफोंड येथील एक व्हॅन रात्रीच्यावेळी चोरली. आपली व्हॅन चोरीस गेलेली आहे याची या व्हॅनच्या मालकालाही कल्पना नसावी. ज्या जागी एटीएम यंत्र बसवले होते ते यंत्र उखडून आरोपेनी चोरीच्या व्हॅनमध्ये टाकले आणि नेसाय येथील जंगलात नेले.
या जंगलात आरोपीनी एटीएम यंत्र फोडले. त्यासाठी लागणारी हत्यार त्यांनी आधीच आणलेली असावेत अन्यथा असे यंत्र फोडणे सर्वसामान्यांना शक्य नसते. एटीएम यंत्र फोडण्यात यश मिळाल्यानंतर आणि आतील संपूर्ण रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपीनी ते एटीएम मशीन तेथेच टाकून पळ काढला.
तत्पुर्वी चोरीची गाडी आरोपीनी मडगावच्या रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिली होती व ते वाहन पोलिसानी जप्त केले असल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली.
आरोपीचा माग काढण्यासाठी काही पोलीस पथके तयार करण्यात आलेली असून या पथकांना अनेक ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली. याधाडसी चोरीचा तपास लावण्यात मडगाव तसेच इतर पोलीस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.