ऑनलाईन टीम/तरुण भारत
Ahmedabad Lift Collapse : गुजरातच्या अहमदाबादमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत अचानक लिफ्ट खाली कोसळली. त्यावेळी ८ जण तिथे उभा होते. १ तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता गुजरात विद्यापीठाजवळील पासपोर्ट ऑफिस रोडवर एका बांधकामाधीन इमारतीची कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ‘अॅस्पायर-२’ असे या बांधकामाधीन इमारतीचे नाव आहे. लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा : गोवा राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; 11 पैकी 8 आमदार भाजपच्या वाटेवर
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इमारतीच्या नवव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. यावेशी कामगार लिफ्टमधून सामान वरच्या मजल्यावर नेते होते. मात्र लिफ्ट सातव्या मजल्यावर पोहोचताच अचानत तुटली, आणि खाली कोसळली, यावेळी लिफ्टमध्ये एकूण ८ मजूर होते. यातील सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कामगारांना लिफ्टमधून बाहेर काढले.