ऑनलाईन टीम/तरुण भारत
लडाखमधील (Ladakh) तुरतुक सेक्टरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराच्या जवानांना (army personnel) घेऊन जाणारी बस श्योक नदीत (Shyok river) कोसळली आहे. यामध्ये ७ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारी भारतीय लष्कराची बस श्योक नदीत (river) पडली. या अपघातात सात जवानांचा मृत्यू (seven soldiers killed) झाला आहे तर अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला.
लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत (river) पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत (seven soldiers killed) घोषित करण्यात आले आहेत. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात येत आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.