Tarun Bharat

7 years of PM Modi : आजही काँग्रेस सरकारनं केलेल्या कामगिरीच्याच बळावर देशाचा कारभार सुरु – संजय राऊत


मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. लगावला आहे. मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही काँग्रेस सरकारनं केलेल्या कामगिरीच्याच बळावर देशाचा कारभार सुरु आहे, असा टोला त्य़ांनी मोदी सरकारला लगावला आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राहुल गांधी यांचं म्हणणं अतिशय गांभीर्यानं ऐकण्याची गरज होती, मोदी सरकारला 7 वर्ष झाली. पहिली पाच वर्षे आणि दुसरी दोन वर्षे तर कोरोनामध्ये वाहून गेली. पण, अद्यापही त्यांनी देशासाठी खूप काही करणं अपेक्षित आहे. गेल्या 60 वर्षातील पंडित नेहरु ते राजीव गांधी, नरसिंह राव यांच्यापर्यंतचा जो लेखाजोखा आहे त्याच पुण्यावर देश चालत आहे. नवीन काही झालेलं नाही पण आपण अपेक्षा करु शकतो. पंडित नेहरुंपासून ते मनमोहन सिंगांपर्यंतच्या सरकारांनी अनेक योजना आणल्या. अनेक प्रकल्प उभे केले आहे. त्यामुळे देशाची जडणघडण झाली. मागच्या या पुण्याईवर देश चालला आहे. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा…हे कोणालाही नाकारता येणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

मोदी सरकारने आत्मचिंतन करायला हवे. सरकारला सात वर्षे पूर्ण झाली तरी अनेक कामे प्रलंबित असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. मोदी सरकारने वादळा दरम्यान करण्यात आलेल्या राज्य आढावा दौर्‍यासांदर्भात मोदी सरकारची भूमिका फक्त विशिष्ट राज्य सांदर्भात होती का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारचे पालन करने हे केंद्राचे कर्तव्य आहे. केंद्राने स्वत: वाद उकरून काढू नये.

सरकारला लोक बहुमताने निवडून देतात. याचा अर्थ लोकांचा सरकारवर विश्वास आहे. मात्र, देशात आजही महागाई, बेरोजगारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली अराजकता आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. सर्वांना अदानी, अंबानी बनायचे नसते. त्यांना रोजगार हवा असतो. उत्तम आरोग्य आणि शिक्षण हवे असते. गेल्या सात वर्षात आपण जनतेला हे देऊ शकलो का? याचं मोदी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. मोदींकडे नेतृत्व क्षमता आहे. ते देशाला योग्य दिशा देतील, जनतेला योग्य मार्ग दाखवतील याची आजही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मोदींना अजून बरंच काही करणं बाकी आहे, असंही ते म्हणाले.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी गाठला 55 लाखाचा टप्पा

datta jadhav

पुणे जिल्ह्यात 5.86 लाख ग्राहकांकडून एप्रिलपासून वीजबिलाचा भरणा नाही

Tousif Mujawar

सोलापूर: नई जिंदगी परिसरात खून

Archana Banage

कृषी कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; राकेश टिकैत

Archana Banage

पाचोरा-जामनेर विस्तारीकरणाचा खर्च केंद्र करणार

datta jadhav

केडीसीसीच्या मोबाईल बँकिंग व अद्यावत वेबसाईटचा आज शुभारंभ

Archana Banage