वार्ताहर / कळंबा
कळंबा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीचे रविवारी झालेल्या मतदानावेळी 70 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान मतदाराच्या मध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. एकूण सहा प्रभागात 7003 पैकी 4807 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांची रेलचेल दिसून येत होती. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. तसेच शेकडो नवमतदार युवक युवतीने ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत प्रथम मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 35 टक्के मतदान झाले. तर दुपारनंतरच्या सत्रात 35 टक्के मतदान पार पडले. यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये सहा प्रभागात कात्यायनी, विद्यामंदिर माळवाडी शाळा, कळंबा गर्ल हायस्कूल या केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांनी 70 % मतदानाचा हक्क बजावला. करवीर पोलिसांनी चोख बंदोबस्तात मतदान पार पडले. तर नोडल अधिकारी म्हणून पुरुषोत्तम ठाकूर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ही आपला भूमिका बजावली.
‘बी’ वॉर्डमध्ये चुरशीने मतदान
‘बी’ या प्रभागात दोन्ही तुल्यबळ उमेदवार असल्याने या प्रभागाची कळंब्यात चर्चेचा विषय बनला होता. या प्रभागात मतदारांच्या मताला ही मोठें मोल आले होते. या प्रभागात सर्वाधिक चुर्षींने 1390 पैकी 1263 मतदान झाले. तर प्रभाग सहा मध्ये 1118 पैकी 657 सर्वाधिक कमी मतदान झाले.