खेळणी व सायकलच्या भागांच्या निर्मितीला चालना देणार
नवी दिल्ली
: देशात खेळणी आणि सायकलच्या सुट्या भागांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारने 7,000 कोटी रुपयांच्या दोन प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना सरकारने सादर केल्या आहेत. पीएलआय योजनेच्या माध्यमातून खेळण्यांसाठी 3,489 कोटी रुपये आणि सायकलच्या सुट्या भागांसाठी 3,597 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या दोन योजनांना कॅबिनेटची मंजुरी मिळताच नियमांना अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच आगामी आर्थिक वर्षाच्या अखेरीस अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.
समितीची रचना
स्थानिक स्थापन करण्यात आलेल्या सुकाणु समितीद्वारे निर्मिती करण्यात येणाऱ्या उत्पादनांची शिफारस केली जाते. या समितीमध्ये उद्योगपती, वाणिज्य आणि उद्योगमंत्रालय आणि इतर सरकारी विभागांचे अधिकारी आपले योगदान देतात. पहिल्या टप्प्यातील योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, फेब्रुवारीतील केंद्रीय अर्थसंकल्पात किमान अर्धा डझन नवीन योजना जाहीर होतील, अशी उद्योजकांची अपेक्षा होती. मात्र, एकाही नव्या योजनेचा अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेला नाही.
पीएलआयसाठी निधीचे वाटप
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, वित्त मंत्रालय नियमितपणे पीएलआयसाठी निधीचे वाटप करत आहे. गोयल म्हणाले, ‘योजना मंजूर करणे ही खरंतर मंत्रिमंडळाची प्रक्रिया असते आणि त्यासंबंधी निर्देश जारी करणे ही मंत्रिपदाची प्रक्रिया आहे. आम्ही अनेक पीएलआय योजना आणल्या आहेत आणि इतर अनेक मंत्रीमंडळाच्या माध्यमातून पीएलआय योजना दाखल होत आहेत. नव्या योजनाही तयार केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी यापूर्वी पीएलआय योजनांसाठी 1.97 लाख कोटी रुपये आणि सेमीकंडक्टरसाठी 76,000 कोटी रुपये दिले आहेत. या योजनांच्या पहिल्या टप्प्यात, अंदाजे 11,848 कोटी रुपयांच्या बचतीपैकी 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाटप केली जाईल.