वृत्तसंस्था/ मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघातील प्रमुख फलंदाज तसेच माजी कर्णधार विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत 7000 धावांचा टप्पा ओलांडला. बेंगळूर संघाकडून अशी कामगिरी करणारा कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे.
आयपीएल स्पर्धेतील गुरूवारी येथील वानखेडे स्टेडियमवर गुजरात संघाविरूद्ध खेळताना कोहलीने हा टप्पा गाठला. या सामन्यात त्याने दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासामध्ये कोहलीने सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांच्या यादीत प्रथम स्थान मिळविले असून शिखर धवन 6205 धावांसह दुसऱया, रोहित शर्मा 5877 धावांसह तिसऱया, वॉर्नर 5876 धावांसह चौथ्या, सुरेश रैना 5528 धावांसह पाचव्या आणि डिव्हिलीयर्स 5162 धावांसह सहाव्या स्थानावर आहेत.